मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विस्कळीत होत आहे. सीएसटीकडे येणाऱ्या एका जलद लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आणि मध्य रेल्वे विस्कळीत झाली. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना मनस्ताप झालाअंबरनाथहून सीएसटीच्या दिशेने एक जलद लोकल जात होती. ही लोकल सकाळी १0.४0 च्या सुमारास कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आली असताच लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लोकल २० ते २५ मिनिटे जागीच उभी राहिली. त्यामुळे जलद लोकल धिम्या मार्गावरून वळवण्यात आल्या. परिणामी, धिम्या लोकल १५-२० मिनिटे उशिराने धावू लागल्या. ११.0५ वाजता लोकलमधील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ही लोकल कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. (प्रतिनिधी)संध्याकाळी सहाच्या सुमारास सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या मधील रुळावर इंटरनेटची असलेली भलीमोठी डिश खाली कोसळल्याची घटना घडली. नामदेव म्हात्रे नावाची व्यक्ती यात किरकोळ जखमी झाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. मात्र यासंदर्भात कुणीही जखमी झाले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकलमध्ये तांत्रिक बिघाड
By admin | Published: June 29, 2016 1:49 AM