शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ठाणे-कोपरखैरणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, वाशीच्या दिशेनं जाणा-या वाहतुकीचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 6:09 PM

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ठाणे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे.

ठाणे, दि. 10 - मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ठाणे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे वाशीच्या दिशेनं जाणा-या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ट्रान्स हार्बर कोलमडल्यानं प्रवाशांच्या हालाला पारावार राहिला नाहीये. ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मध्य मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या कालावधीत, अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला होता, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेतला होता. पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आला होता.रेल्वे रुळामधील खडी आणि स्लीपर्स बदलणे, ओव्हरहेड वायरसह सिग्नल यंत्रणेची तपासणी करणे, अशा कामांसाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. याच कामासाठी रविवारी मध्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. यामुळे वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात आली. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या, सकाळी १०.८ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंतच्या लोकलला घाटकोपर, विक्रोळी भांडुप, मुलुंड या स्थानकांत विशेष थांबा देण्यात आला होता. यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचल्या होत्या.

 हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३७ या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेलहून सुटणा-या डाउन लोकल बंद राहिल्या होत्या. याच मार्गावरील अप लोकल सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ या वेळेत बंद होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेया चालविण्यात आल्या होत्या.