शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

टेक्निकल टेक्सटाइल मिशनची स्थापना करणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 08:43 IST

शंभर दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने घेतला आढावा

मुंबई : महाराष्ट्रात टेक्निकल टेक्सटाइल मिशन, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका बैठकीत दिले. नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स २०२५मध्ये सहभाग घ्यावा, टेक्निकल टेक्सटाइल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागवावीत तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी  आढावा घेतला. हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षाकवच प्रदान करण्याच्या दृष्टीने वृध्दापकाळासाठी निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.  हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करण्याबाबत योजना तयार करावी. प्रसार भारतीच्या सहकार्याने ‘करघा’ या पारंपरिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारित करावा. सूतगिरण्यांमध्ये प्राधान्याने सौरउर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्याच्याही सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

‘आवास योजनेतील प्रत्येक घर सौर उर्जेवर करा’ - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किमान १३ लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येईल. याकरिता लवकरच लाभार्थ्यांना पहिला ४५० कोटींचा हप्ता वितरित करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबवावे.

- त्याचप्रमाणे आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौरउर्जेवर करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. ग्रामीण रस्ते सिमेंटचेच करावे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पाणंद रस्ते यातील निकष नव्याने ठरवावेत. 

- कोकणातील साकव तसेच पाणंद रस्त्यांची कामे तत्काळ हाती घ्यावीत. प्रत्येक तांड्याकरिता रक्कम देण्यात आली असून, किती कामे झाली, यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना दिल्या. 

‘कामगारांना स्मार्ट रेशन कार्ड द्या’ स्थलांतरित कामगारांना स्मार्ट रेशनकार्ड द्यावे. कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असतील तर त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रेशन दुकानात धान्य मिळेल, असे सांगण्याचा सूचना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

आगामी वर्षात २५ लाख नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्याचे ई-केवायसी करून प्रमाणिकरण करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले, मागील ६ महिन्यात एकदाही अन्न धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी. संगणकीकृत न झालेल्या १४ लाख लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवावी.  

बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTextile Industryवस्त्रोद्योग