पाटोदा (जि. बीड) : परीक्षा तोंडावर असताना अभ्यास न झाल्याने तणावात असलेल्या एका विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंंकाळी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. प्राजक्ता संतोष गव्हाणे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. पुढील महिन्यात बारावीची परीक्षा असून, पुरेसा अभ्यास न झाल्याने प्राजक्ता तणावात होती. यातूनच शुक्रवारी सायंकाळी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ती ७५ टक्के भाजली आहे.
अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने घेतले पेटवून
By admin | Published: February 06, 2017 2:46 AM