मुंबई : तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना झालेली विषबाधा बाहेरून खाल्लेल्या पदार्थांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आयआरसीटीसीने काढला आहे. तेजस एक्स्प्रेसमधील अन्य प्रवाशांनादेखील नाश्ता, जेवण देण्यात आले होते. अन्य प्रवाशांनी एक्स्प्रेसमधील पदार्थांवर समाधानकारक प्रतिक्रिया दिेली आहे. यामुळे प्रवाशांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे आयआरसीटीसीने अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी २ अधिकाºयांना निलंबित केले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला.ट्रेन क्रमांक २२१२० तेजस एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना रविवारी प्रवाशांना विषबाधा झाली होती. घटनेनंतर कॅटरिंग ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. तसेच मध्य रेल्वे, आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आलीे. समिती अहवालात एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांचा दर्जा हा समाधानकारक होता. पर्यटक गु्रपमुळे प्रवाशांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. गाडी पूर्णत: वातानुकूलित असल्यामुळे दुर्गंधीमुळे अन्य प्रवाशांना त्रास झाला, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
तेजस एक्स्प्रेस प्रकरण, प्रवाशांच्या चुकीमुळेच झाली विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 5:06 AM