शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सांगा, कसे शिकायचे? जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 8:13 AM

सरकारला केव्हा येणार जाग? ट्रायबल फोरमचा सवाल; साडेतीन वर्षे भरती नाही

अमरावती : राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती २०१९ मध्ये उठविण्यात आली. मात्र, साडेतीन वर्षे लोटूनही शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १८ हजारांवर पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या ‘पीटीआर`नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते. सध्या याच पटसंख्येच्या आधारावर मंजूर असलेल्या पदांपैकी १८ हजारांवर पदे रिक्त आहेत. २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’ आणून शासनाने शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१९ च्या डिसेंबरमध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली.

पावणेदोन लाख डीएड, बीएडधारकांनी ही परीक्षा दिल्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सध्या कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे. 

राज्यात ५० हजारांवर शिक्षकांचा तुटवडानगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा येथील रिक्त पदांचा कानोसा घेतल्यास ५० हजारांवर शिक्षकांचा राज्यात तुटवडा आहे. 

जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब, सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षक भरतीला प्राधान्य द्यावे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.     ॲड. प्रमोद घोडाम,     संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

शिक्षकांच्या रिक्त पदांवर नजर...

जिल्हा    मराठी    उर्दू अहमदनगर    ३४७    २७ अकोला    २८८    १२१ अमरावती    ३२०    ०४ औरंगाबाद    ५६९    ९६ बीड    ४११    ७५ भंडारा    ३०८    -बुलडाणा    १७३    ७६ चंद्रपूर    २०४    -धुळे    ३२१    २७ गडचिरोली    २६५    -गोंदिया    २९१    -हिंगोली    ८७    -जळगाव    ३६३    १९७ जालना    २०३    ३१ कोल्हापूर    ९७२    १८ नागपूर    ७६९    ०१ नांदेड    ७३२    ५६ नंदुरबार    ३४५    ३२ नाशिक    ५३१    ०३ पालघर    १९१६    -

जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची संख्या १८ हजारांवर आहे. रोस्टरनुसार मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाची १३०१ पदे रिक्त आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र