मुंबई : पुढच्या वर्षी अकरावी प्रवेश कसे होणार आहेत, याची माहिती दोन आठवड्यांत सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले.न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुढच्या वर्षीच्या अकरावी प्रवेशाची आखणी करण्यासाठी शालेय शिक्षण प्रधान सचिवांनी मुंबई व पुणे शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी व योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच या निर्णयाची माहिती येत्या ५ आॅगस्टला न्यायालयाला द्यावी, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.हे आदेश हे मुंबई व पुण्यासाठी आहेत. त्यामुळे शासनाने दोन्ही शहरांसाठी ही आखणी करावी, असेही खंडपीठाने शासनाला सुनावले. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याने यात बदल करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका वैशाली बाफना यांनी केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिले. (प्रतिनिधी)
अकरावी प्रवेश कसे होणार ते आत्ताच सांगा?
By admin | Published: July 25, 2015 1:34 AM