शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोणती कामे अडवली ते सांगा

By admin | Published: October 25, 2016 11:53 PM

आयुक्तांचा सवाल : वादावर दिवाळीनंतरच पडदा

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 25 - शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपये थकविल्याने माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे. कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी देणी दिली जाणार आहेत. कारखान्यांच्या जमिनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखान्यांची किंमत काढण्याचे आदेश श्रीगोंदा तहसीलदारांना मंगळवारी दिला आहे. बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले थकविली आहेत. थकीत देणी मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बँकेचे प्रतिनिधी, कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलविली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार, साईकृपा कारखान्याचे कैलास जरे, एच. आर. मुंडे, चंद्रकांत गुंगे, आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र देवगावकर, काँ. बाबा आरगडे, विधी सल्लागार अ‍ॅड़ कारभारी गवळी, देविदास कदम आदी शेतकरी बैठकीस उपस्थित होते.साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांची ३५ कोटींची ऊसाची बिले थकविली आहेत. ती मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. उच्च न्यायालयाने कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिला. मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती. अखेर कारखान्याची विक्री करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यात बँकेचीही कारखान्याकडे थकबाकी आहे. प्रशासनाने कारखाना उभा असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावले आहे. कारखान्याची किंमत निश्चित करण्याच्यादेखील सूचना संबंधितांना केल्या आहेत. किंमत निश्चित करून त्यानुसार कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे. कारखाना विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कवडे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मिळणार पैसेसाईकृपा कारखान्याची विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखाना ताब्यात घेतला जाणार आहे. कारखाना ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे देण्याचे अाश्वासन कवडे यांनी यावेळी दिले.