मुंबई : मुंबईसह राज्यातील नागरिकांना आता उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १४ शहरांचे कमाल तापमान थेट ४० अंशावर नोंद झाले आहे. यात जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम या शहरांचा समावेश आहे.मुंबईचे आकाश निरभ्र असून, कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईतील कमाल तापमानाचा कल कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याने १९ एप्रिल रोजी मराठवाडा, विदर्भात, तर २० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल. २१ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील १४ शहरांचे कमाल तापमान ४० अंश पार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 1:15 AM