पुणे : राज्यात तापमानाचा पारा चढताच असून कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भिरा येथे ४२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे १५़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ अहमदनगर, मालेगाव, भिरा येथील कमाल तापमानाने ४० अंशाचा आकडा बुधवारी पार केला़ उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे़ पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, पश्चिम बंगाल येथील कमाल तापमानात वाढ झाली आहे़ याशिवाय तामिळनाडू, रायलसीमा, कोकण, कर्नाटक किनारपट्टी येथील कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़ राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६़९, जळगाव ४०़२़, कोल्हापूर ३७़, महाबळेश्वर ३३़२, मालेगाव ४०़८, नाशिक ३७़३, सांगली ३८़४, सातारा ३७, सोलापूर ३८़८, मुंबई ३१़५, अलिबाग ३०़९, रत्नागिरी ३४, पणजी ३४़९, डहाणु ३२़६, भिरा ४२, उस्मानाबाद ३७़९, औरंगाबाद ३७़२, परभणी ३८़४, बीड ३८़२, अकोला ३९़९, अमरावती ३८़८, बुलढाणा ३७़४, ब्रम्हपुरी ३८़३, चंद्रपूर ३९, गोंदिया ३७़२, नागपूर ३८़४, वर्धा ३९, यवतमाळ ३५़५़ (प्रतिनिधी)
तापमानाचा चढता पारा
By admin | Published: March 23, 2017 2:29 AM