शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पंढरपूरची स्वच्छता मंदिर समिती करणार, ७ एप्रिलपासून मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:29 AM

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिर परिसरासह, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, खासगी कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार आहे़ खासगी कंपनीचे कर्मचारी ७ एप्रिलपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

पंढरपूर (जि. सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिर परिसरासह, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, खासगी कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार आहे़ खासगी कंपनीचे कर्मचारी ७ एप्रिलपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करणार आहेत.राज्याच्या कानाकोपऱ्यातून सरासरी रोज ३० हजारांपेक्षा जास्त भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात़ मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व वाळवंटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व अन्य कचरा पडलेला असतो़ त्याचा त्रास भाविकांनाच होतो़ याबाबत काही भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जाते़ विठ्ठल मंदिर समितीने आजवर मालकीच्या परिसराबाहेर स्वच्छतेसाठी कधी पाऊल उचलले नव्हते़ मंदिर समितीला उत्पन्न मिळते म्हणून नगरपरिषदनेही फारसे लक्ष दिले नाही. या वादातून चार वर्षांपूर्वी वार्षिक उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम स्वच्छता, पाणी, दिवाबत्तीसाठी द्यावी, अशी मागणी नगरपरिषदेने मंदिर समितीकडे केली होती़ त्यानंतर मंदिर समितीने काही प्रमाणात स्वच्छतेसाठी हातभार लावत शहरातील मठ, मंदिरे, ठिकठिकाणी शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिले़मंदिर समितीने मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला वार्षिक ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे़- कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती, पंढरपूरवारकºयांनी घरातून निघताच पांडुरंगाच्या पवित्र स्थळी चाललो आहोत़ ते पवित्र स्थळ अपवित्र होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर