मलकापूर - रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जात असलेल्या टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरून उपमार्गावर पलटी झाला. या अपघातात चालकासह दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनासह आंब्याच्या पेट्या रस्त्यावर विस्कटल्यामुळे आंबा रस्त्यावर पडाला होता. अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार टेम्पो (क्रमांक एम एच ०८ ए पी २७४० ) मधून दोघेजण रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जात होते. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत आले असता टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो महामार्गावरून उपमार्गावर पलटी झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर वाहनांसह आंब्याच्या पेट्या रस्त्यावरच विस्कटल्या होत्या. आंब्याच्या पेट्या तुटल्याने परिसरात आंबा सर्वत्र पडला होता. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, मानसिंग सुर्यवंशी, योगेश पवार, अमित पवार, जितेंद्र भोसले तातडीने आपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी कराड शहर पोलीसठाण्यात खबर देऊन मदत कार्य केले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. महामार्ग देभालचे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत केली.