शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

एसटीमध्ये २०१९ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 9:37 PM

लॉकडाऊन कालावधीमध्ये एसटी महामंडळाची प्रवासी सेवा ठप्प आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे.

मुंबई : सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदामध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने शुक्रवारी घेतला आहे. मात्र एसटी कर्मचारी संघटनेकडून या निर्णयाबाबत विरोध करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये एसटी महामंडळाची प्रवासी सेवा ठप्प आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. सामान्य जनजीवन सुरळीत होऊन एसटीची प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईपर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पूर्णपणे प्रवासी वाहतूक होत नसल्याने, वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी उपलब्ध आहेत.

सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत चालक आणि वाहक पदामध्ये रोजंदार गट क्रमांक १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात यावी. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार व चालविण्यात येणाऱ्या नियतानुसार आवश्यकता असल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार पुन्हा घेण्यात येईल.

सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक- टंकलेखन, राज्यसंवर्ग व अधिकारी पदामध्ये व अनुकंपा तत्वावर उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास त्या उमेदवारांचे प्रशिक्षण शुक्रवारपासून तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावे. कार्यवाहीचा सविस्तर अहवाल शनिवारी सादर करण्यात यावा, असे परिपत्रक एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे.

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवर जाहिरात काढून भरती करण्यात आलेली तर, मग आता सेवा तात्पुरती खंडित कशासाठी करता ? सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तत्काळ मागे घ्यावा.- मुकेश तीगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

२०१९ पासून भरती झालेले चालक तथा वाहक या पदावरील कर्मचारी आपल्या पहिल्या नोकऱ्या सोडून एसटी महामंडळात रुजू झालेले आहेत. तेव्हा या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. अनुकंपा तत्वाची नोकरी हि एसटीचा कर्मचारी दिवंगत अथवा कायमचा जायबंदी झाल्यावर त्याच्या वारसाला ते कुटुंब जगवण्यासाठी ती नोकरी दिलेली असते. परंतु, त्याचेही प्रशिक्षण अथवा नोकरी थांबविणे, अत्यंत अन्यायकारक आहे.- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी महामंडळाकडून ८ हजार २२  भरती चालक तथा वाहक पदाची जाहिरात होती. यापैकी ४ हजार ५०० पात्र कर्मचार्यांना भरती करण्यात आले. यापैकी १ हजार ३०० कर्मचारी कामावर रुजू झाले होते. तर, ३ हजार २०० कर्मचारी प्रशिक्षक होते. त्यामुळे या सर्वानावर उपासमारीची वेळ येणार आहे, असे मत कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :state transportएसटी