हे तात्पुरते खातेवाटप; जयंत पाटील यांच्या ट्विटने ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:28 AM2019-12-13T10:28:05+5:302019-12-13T10:28:41+5:30

राज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. मात्र हे खाते वाटप तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच यथोचीत खातेवाटप होईल, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 

This temporary minstery expansion ; Jayant Patil's tweet | हे तात्पुरते खातेवाटप; जयंत पाटील यांच्या ट्विटने ट्विस्ट

हे तात्पुरते खातेवाटप; जयंत पाटील यांच्या ट्विटने ट्विस्ट

Next

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या मंत्रीपद खातेवाटपाला अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडे अर्थ, काँग्रेसकडे महसूल आणि शिवसेनेकडे गृहखाते गेले आहे. मात्र सध्या झालेले खातेवाटप तात्पुरते असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे या खातेवाटपात पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. 

राज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. मात्र हे खाते वाटप तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच यथोचीत खातेवाटप होईल, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 

येत्या 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या शपथविधीपासून सर्वच मंत्री खात्यावाचून मंत्री होते. अखेर या मंत्र्यांना खाती मिळाली आहेत. खातेवाटप झाल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या खातेवाटपासंदर्भातील ट्विटमुळे ते नाराज आहेत, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटमुळे नवीन ट्विस्ट आला आहे. 

Web Title: This temporary minstery expansion ; Jayant Patil's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.