शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

फेरनियोजनात तात्पुरता दिलासा

By admin | Published: September 05, 2015 1:30 AM

पहिल्या पर्वणीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक

नाशिक : पहिल्या पर्वणीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी फेरनियोजन करण्याचे प्रशासनाने ठरविले. मात्र नाशिक रोडला येणाऱ्या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविण्यात आले आहेत.पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. १२ व १३ सप्टेंबर रोजी अमावास्या असल्याने दोन दिवस भाविकांची स्नानासाठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी १२ रोजी पोळा सण व सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील भाविक येण्याची शक्यता कमी आहे; परंतु परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील, असे या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रकारच्या सूचना तसेच काही तक्रारीही केल्या, त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणाऱ्या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. या नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की कर्फ्यू होता, हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.त्र्यंबकच्या साधुग्राममध्ये श्वानाचा हैदोसत्र्यंबकेश्वर रोडवर पेगलवाडी फाट्याजवळील साधुग्राममध्ये गुरुवारी सकाळी एका भटक्या श्वानाने हैदोस घातला़ या श्वानाने साधू-महंत तसेच साधुग्राममध्ये आलेल्या तब्बल २९ जणांना चावा घेतला आहे़ त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या भटक्या श्वानाची त्र्यंबकेश्वरमध्ये दहशत पसरली आहे़त्र्यंबकेश्वरच्या साधुग्राममधील काही साधू-महंत हे गुरुवारी सकाळच्या सुमारास त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी चालले होते, तर काही भाविक या ठिकाणी सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांसाठी आलेले होते़ यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने भविकांसह साधू-महंतांना चावा घेण्यास सुरुवात केली़ आवाहन आखाड्यातील नित्यानंद पुरी महाराज व स्वरूपानंद महाराज शिबिरातील रुद्रप्रकाश अवस्थी महाराज या दोघांसह पेगलवाडीतील अल्पवयीन मुलगा गणेश सिरसाठे यांना या कुत्र्याने अधिक प्रमाणात चावा घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ भटक्या कुत्र्यांच्या या समस्येवर तातडीने उपाय काढण्याची मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.