लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या दहा सहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नियुक्तीच्या प्रतीक्षेतील व बदली आदेशाधीन तीन अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिले. वायरलेस विभागातील दोन अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या. मरोळ प्रशिक्षण केंद्रातील रवींद्र पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केली. शनिवारी गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उपअधीक्षक भारतकुमार राणे यांची कोल्हापूर विशेष महानिरीक्षकांच्या वाचक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. तर अशोक भरते व गणेश बिरादार यांची अनुक्रमे रेल्वे पुणे मुख्यालय व औरंगाबादच्या सिल्लोड उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. बिनतारी संदेश विभागाच्या (वायरलेस) नागपूर विभागातील अधीक्षक पी.टी. सोनावणे यांची पुण्याच्या वायरलेस विभागात बदली केली. तेथील आय.डी. कांबळे यांची सोनावणेंच्या पदावर नियुक्ती केली.दीड महिन्यापूर्वी बदली झालेल्या मात्र त्या ठिकाणी हजर न झालेल्या सुदर्शन मुंढे यांना अहमदनगरला कर्जत उपविभागात पोस्टिंग दिले. राजेंद्र साळुंखे यांची कर्जतऐवजी साताऱ्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात व राजलक्ष्मी शिवणकर यांची नांदेडऐवजी सातारा मुख्यालयात बदली केली. अन्य उपअधीक्षकांची नावे - (कोठून-कोठे) अशोक बनकर (इतबारा-तासगाव), शंकर जिरगे (पोलीस अकादमी, नाशिक-एसीबी), प्रदीप पाटील (धर्माबाद-खामगाव, बुलडाणा).
दहा सहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या
By admin | Published: June 19, 2017 2:46 AM