शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दोन अपघातांत राज्यात १० ठार

By admin | Published: March 04, 2016 3:11 AM

दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत राज्यातील १० जणांना जीव गमवावा लागला. पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळजवळ (जि. सातारा) जीप उलटून चार तरुण मृत्युमुखी पडले.

सातारा़/चंद्रपूर : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत राज्यातील १० जणांना जीव गमवावा लागला. पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळजवळ (जि. सातारा) जीप उलटून चार तरुण मृत्युमुखी पडले. तर चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. ते सर्व मध्य प्रदेशातील पचमढी येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी जात असताना हैदराबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे हा अपघात झाला.शिरवळजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे जीप पलटी होऊन अपघात झाला. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. गणेश बोणे (१९), दस्तगीर नबीलाल नाकनिगल (२८, दोघे रा. सारोळा, ता. भोर, जि. पुणे), अतुल बरकडे (३०, रा. गुणंद, ता. भोर), प्रशांत राऊत (२५, रा. राऊतवाडी, ता. भोर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत; तर जीपचालक हनुमंत निगडे (२८, रा. भोंगवली, ता. भोर) व जीपमधून बाहेर पडलेले अमित पवार (१९, रा. सारोळा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत जिवलग मित्र होते. मध्य प्रदेशातील पचमढी येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी चाललेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात सहा भाविक जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. चालकाला पहाटेची चालकाला डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडली.जगदीश मोहितकर (३५), रमेश पोतनूरवार (४५), पंचफुला भाऊराव निमसरकार (४५) सर्व माथा (ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर), सुशीला शेडमाके (५५), मनीषा संधू (२८), सिमरण संधू (४) (सर्व रा. रामपूर ता. राजुरा, जिल्हा चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर उषा मोहितकर (३२), वंदना पोतनूरवार (३५), सुषमा हंसकर (३४), सुरेश हंसकर (३६), दिव्यानी मोहितकर (५) आणि चालक संजय तुलावी (३५) रा. चुनाळा हे सर्व जखमी आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)