यशवंत हिवराळे, ऑनलाइन लोकमत
राजूरा (वाशिम), दि. १० - ब्रिटीश कालीन युगात राजु-याचा दसरा प्रसिद्ध होता. सोळा गाव वंजारवाडीसह राज्याच्या बहुतांश भागातील जनतेचा तो उत्सव होता . दसरा सप्ताहाला दरम्यान रावबहादूर राजूरकर घराण्यातील अबाल वृद्धांचा भरजरी व रुबाबदार पेहराव व शौयगाथा बघून अथवा इतरांकडून ऐकून पंचक्रोशतील बुजूर्ग म्हणत असत... राजु-याच्या दसरा उत्सवात ‘देव पहावा की राव पहावा’.
ब्रिटीशांचे राजवटीत परिसरातील सोळा गाव वंजारवाडीचा कारभार न्यायनिवाडा येथील राजूरकर घराण्यांच्या पुर्वजांकडून बघीतला जात होता. त्यांचे शौर्य, राजेशाही थाट व सर्वांसाठी समाज न्याय या कायार्ची दखल घेत इंग्रजानी त्यांना रावबहादूर ही पदवी सन्मानपुर्वक बहाल केल्याचे वयोवृद्ध सांगतात. अनेक सुख, दुखाची साक्ष ठरलेली ब्रिटीशकालीन भव्य गढी, पिंपळवाडी गावानजीक शुरविर महिलांच्या बलीदानाच्या शिळा व अनेक वास्तुशिल्प गावांच्या पुरातन इतिहासाची साक्ष देत आजही कायम आहेत . काळाच्या उदरात गाव खेडयातील पुरातन वास्तू दिसेनाश्या झाल्या असताना येथील गढी बुरुजू आपले अस्तित्व आजही टिकून आहे. या गढीचा निर्मिती ५०० वषार्पुवीर्ची असून ती इंग्राजाच्या ताब्यात होती. कालातराने इंग्रजाना देश सोडून जाण्याची वेळ आली तेंव्हा त्यांनी गढीचा लिलाव केला असता, राजुरकरांचे पुर्वज यशवंतराव अवघडराव राजुरकर यांनी विकत घेतल्याचे त्यांचे वयोवृद्ध वंशज सांगतात. पुढे या गढीवर राजूरकरांनी स्वतच: राजवाडा बनवून १६ गाव वंजारवाडीचा कारभार गढीवरुन बघीतला. साधारण १९४५ पर्यंत या गढीवर वस्ती होती . ७० फुटांवर उची असलेल्या गढीवरुन राजूरा गावाची शत्रू पासूनची सुरक्षितता व निगराणी जपली जायची.
यापुर्वी इतर गावांवर चढाया ,गावातील साधन संपत्तीवर कब्जा करुन विजय मिळविणे ही बाबत राजेरजवाडयांसाठी प्रतिष्ठेचा विषय मानली जात होती अशातच एका वेळी गावातील राबहादूर मंडळी घरी नसताना गावावर डाका टाकण्याचे उदेशाने दरोडेखोंराचा जमाव चाल करुन आला असतान गढीवर केवळ महिलाच होत्या, पंरतु त्या शुरविर महिलांनी प्रसंगावधन राखत धिर न खचू देता अंगावर पुरुषांचा वेश परिधान करुन पाठीला आपली चिमुकली मुल बांधून हातात शस्त्र घेवून दरोडेखोरांशी दोन हात करुन शत्रुंना लढा दिला व गावाची सुरक्षीतता जपली. दरोडेखोराशी लढा देत त्यांना पाच किमी अंतरावरील पिंपळवाडी गावाचे सिमापार हाकलून लावले ,परंतु महिलांच्या शौयार्पुढे जिवाचे आकांताने घनदाट जंगल असलेल्या पिंपळवाडी परिसरात झुडपाआड लपूून बसलेल्या काही दरोडेखोरांना या महिलांच्या पाठीवरील मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकल्याने लढा देणारे पुरुष नसून महिला असल्याची खात्री झाली. त्यामुळे हलगी व तुतारीचा नाद करीत इतर साथीदारांना माघारी बोलावत पिंपळवाडी गावाजनीक महिलावर शस्त्र हल्ला करीत काही महिलां ठार केल्यात. त्या घटनेची साक्ष म्हणून त्या जागेवर सुरेख नक्षीकाम केलेल्या उंच शिळा रोवलेल्या असून हर्षागणीक दसरा सणाला त्या ठिकाणी जाउन पुजा अर्चा करुन नवैद दिला जातो. पुर्वी दसरा सप्ताहा दरम्यान पंचक्रोशतील नागरिकांना दसºयाचे दिवशी नगर भोजन दिले जाते अस.े दसºयाचे दिवशी राजूरकर घराण्याचे दैवत भगवान बालाजींच्या मुतीर्ची पालखीव्दारा भव्य मिरवणूक निघत असते . मिरवणुकीत हत्ती, घोडे, भजनीमंडळ यांचा समावेश असायचा . मिरवणुकीच्या पुढे अंगावर भरजात वस्त्रे परिधान करुन हातात शस्त्रास्त्रे घेउन रुबाबदार दिसणारी रावबहादूर मंडळी असायची. हा उत्सव बघायला विदर्भासह, मराठवाडा, खानदेशातील मंडळी मोठया संख्येत असायची . राजूºयाचा हा दसरा उत्सव बघून अनेकांच्या तोंडून आपसुकच शब्द निघायाचे राजुºयाचा दसºयात‘ देव पहावा का राव पहा’. काळाचे ओघात सर्व लोक पावले असलेतरी आजही येथे दसºयाचे दिवशी भगवान बालाजीची पालखी व्दारा मिरवणूक काढणे, विध करणे व भक्तीभावे पुजनाची परंपरा जपली जात आहे.