गडचिराेली :कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या विस्कळीतपणानंतर यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता व्यवसाय सुरळीत झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी तेंदूपत्त्याच्या व्यवसायात ३०० काेटींच्या वर उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोरोनानंतर सावरला तेंदुपत्ता1. गेली दोन वर्षे काेराेना साथीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. राष्ट्रीय बाजारपेठेतही तेंदूपत्त्याचा तुटवडा निर्माण झाला हाेता. परिणामी ज्या व्यापाऱ्यांकडे जुना तेंदूपत्ता शिल्लक हाेता, त्याला दामदुप्पट भाव मिळाला. 2. यावर्षी काेराेनाचे संकट नसल्याने जवळपास सर्वच ग्रामसभांचा तेंदूपत्ता विकला गेला. बहुतांश ग्रामसभांना प्रति स्टँडर्ड बॅग (एक हजार तेंदूपत्ता पुडे) १० हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला.
वनविभागाला १२ काेटींचा महसूल- वनविभागाकडे तेंदूपत्त्याचे केवळ ३० युनिट - या युनिटमधून ४१ हजार ३४५ स्टँडर्ड बॅग तेंदूपत्ता संकलन - यातून वनविभागाला ११ काेटी ८० लाख ३१ हजार रुपयांची राॅयल्टी मिळाली
पावसानेही दिली साथ तेंदूपत्त्याचा व्यवसाय जवळपास मे महिन्याचा पहिला आठवडा ते जून महिन्याचा पहिला आठवडा या कालावधीपर्यंत चालताे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तेंदूपत्त्याची उचल करून गाेदामामध्ये साठवणूक केली जाते. या कालावधीत पाऊस झाल्यास तेंदूपत्ता भिजून माेठे नुकसान हाेते. मात्र यावर्षी अजूनपर्यंत पाऊस आला नसल्याने नुकसान टळले आहे.गडचिराेलीच्या तेंदुपत्त्याला विशेष पसंतीराज्यात गाेंदिया, चंद्रपूरसह तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांमध्येसुद्धा तेंदूपत्त्याचे संकलन केले जाते. मात्र गडचिराेली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, धानाेरा या तालुक्यांमधील तेंदूपत्ता आकाराने माेठा आहे. तसेच दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांमधील व्यापारी तेंदूपत्ता संकलनासाठी गडचिराेली जिल्ह्यात येतात.