शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तन्मय भटविरुद्धच्या कारवाईवरून पोलिसांसमोर पेच

By admin | Published: May 31, 2016 6:47 AM

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या एआयबी समूहाच्या सह संस्थापकांपैकी एक असलेल्या तन्मय भट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो का?

डिप्पी वांकाणी, मुंबई प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या एआयबी समूहाच्या सह संस्थापकांपैकी एक असलेल्या तन्मय भट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो का? याबाबत पोलीस चाचपणी करीत असून तेही संभ्रमात आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मनसेकडून याबाबत तक्रार आली आहे. त्यातून हे सूचित करण्यात आले आहे की, भादंविच्या कलम ५००नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. तथापि, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ही वादग्रस्त पोस्ट टिष्ट्वटर आणि फेसबुकवरून हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या तपासानुसार हे प्रकरण भादंविच्या कलम ५०० नुसार मानहानीचे आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे आम्ही भट यास चौकशीसाठी तत्काळ बोलविणार नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या अधिनियमानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाउ शकतो का? याचीही चाचपणी सुरु आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडिओ डिलिट (नष्ट) करण्यासाठी आम्ही फेसबूक आणि यू ट्यूबला विनंती केली आहे. तत्पूर्वी हा प्रमुख पुरावा असलेल्या व्हिडिओचा आम्ही पंचनामा करत आहोत. दरम्यान, एका वकीलाने दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर हे मानहानीच्या या प्रकरणात तक्रार देत नाहीत तोपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नाही. कारण, या प्रकरणात फक्त हे दोघेच तक्रार देउ शकतात. .........