पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २0१६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज २0 जूनपर्यंत नियमित शुल्कासह स्वीकारले जात होते. तसेच २१ ते २४ जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार होते. मात्र, विद्यार्थिहित लक्षात घेऊन २४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज हे नियमित शुल्कानुसारच स्वीकारले जाणार आहेत. तर २५ जूनपासून अतिविलंब शुल्काने परीक्षा अर्ज स्वीकारले जातील, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
दहावीचे परीक्षा अर्ज नियमित शुल्कानुसार २४ जूनपर्यंत स्वीकारणार
By admin | Published: June 21, 2016 12:40 AM