पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेतल्या जाणाऱ्या पीएसआय पदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांच्या वयाची पात्रता वाढवण्यात आली असल्याचे एमपीएससीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. एमपीएससीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार १ एप्रिल २०१७ रोजी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याचे वय ३१ वर्षे व मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्याचे वय ३४ वर्षे असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. एमपीएससीतर्फे वयोमर्यादेबाबत परिपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
पीएसआय पद वयवाढीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: December 24, 2016 12:47 AM