- गणेश वासनिकअमरावती : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतशिवारालगतच्या वसाहतींमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत ४ हजार ८०० च्या जवळपास बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आहे. संध्या वाढत असल्याने बिबट्यांचे नियंत्रण हाताबाहेर जात असल्याचे वास्तव आहे.ज्या बिबट्याला बघायला मनुष्य जंगल गाठतो, तो आता सहज मानवी वस्तीत आढळून येत आहे.
बचाव दलाची गरज सध्या महाराष्ट्रात बिबट-मानव संघर्ष कमालीचा उभा झाला आहे. वन्यप्राणी बचाव दलाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
खरे तर बिबट्यांच्या संख्येत वाढ हाेणे निसर्ग साखळीसाठी चांगली बाब आहे. विशेषत: उस शेतीमध्ये बिबट्याचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते. अहिल्यादेवीनगर, नाशिक या भागातील मानवी वस्तीत संचार ही नित्याचीच बाब झाली आहे. बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे ते जंगलाबाहेर येत असावे.- आदर्श रेड्डी, वनसंरक्षक, मेळघाट
दोन वर्षात ५०० ने भर बिबट्याची ‘सरप्राइज व्हिजीट’ त्याच्या जिवावर उठली आहे. हल्ली ‘पॉश’ वस्तीपासून तर उसाच्या मळ्यापर्यंत बिबटे सहजतेने आढळून येत आहेत.बिबट्यांच्या संख्येत दोन वर्षांत जवळपास ५०० ने भर पडली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्याचा वावर आढळत आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने बिबट्यांची संख्या अधिक आहे. असे असले तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही ही संख्या २ हजारांच्या वर आहे, अशीही माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे.