शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दहशतवादी सलिक होता नागपूर ‘एटीएस’ ला वॉन्टेड!

By admin | Published: November 01, 2016 2:42 AM

औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला

नरेश डोंगरे,

नागपूर- भोपाळनजीक पोलिसांनी सोमवारी पहाटे कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी तिघांचे महाराष्ट्रात खास करून विदर्भ-मराठवाड्यातील नागपूर, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये जबरदस्त नेटवर्क होते. औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला होता. तर, या चकमकीनंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला मोहम्मद सलिख हा दहशतवादी नागपूर-औरंगाबाद एटीएसला ‘वॉन्टेड’ होता. गेल्या चार वर्षांपासून सलिखचा ताबा मिळावा म्हणून राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रयत्नरत होते. भोपाळ जेल ब्रेक आणि एन्काऊंटरनंतर ही खळबळजनक बाब उजेडात आली आहे. भोपाळमध्ये जेल ब्रेक झाल्याचे वृत्त सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास स्थानिक सुरक्षा यंत्रणांना कळले. त्यानंतर मोहम्मद खालिद अहमद, शेख मुजीब, मजीद, अकील खिलजी, जाकीर, महबूब, अमजद आणि सलिख या दहशतवाद्यांच्या शोधार्थ एटीएस आणि पोलीस रेल्वेस्थानक तसेच नागपूर शहराला जोडणाऱ्या मध्य प्रदेशच्या सर्व मार्गावर शोधकार्य राबवू लागले. काही वेळेनंतर या सर्व दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्याचे कळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे पुढे येताच सुरक्षा यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली. कारण या आठ दहशतवाद्यांपैकी तिघे प्रत्यक्ष महाराष्ट्रातील घातपाती कृत्य तसेच घातपाताच्या कटकारस्थानाशी जुळलेले होते. दहशतवादी मोहम्मद खालिद अहमद हा मूळचा सोलापूरचा निवासी होय. एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, तो प्रारंभी सिमीत सक्रिय होता. सफदर नागोरी आणि रियाज भटकळच्या संपर्कात आल्यानंतर खालिद खतरनाक दहशतवादी बनला. तो नंतर इंडियन मुझाहिदीनमध्ये (इंमू , सिमीची पुढची आवृत्ती) काम करू लागला. तपास यंत्रणांच्या नजरेत येताच तो महाराष्ट्रातून एकाएक गायब झाला. त्यावेळी सिमीवर बंदी येण्यापूर्वी राज्याचा महासचिव म्हणून काम करणारा जियाउद्दीन सिद्दीकी (औरंगाबाद) याच्या संपर्कात खालिद आला.त्यानंतर सिमीचे राज्यभरात जोरदार नेटवर्क तयार झाले. औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात त्यांनी सिमीच्या स्लीपरची भलीमोठी फळी तयार केली. घातपाती कृत्य करण्यासोबतच सिमी-इंमूचे दहशतवादी स्लिपर्सच्या माध्यमातून बँका लुटून, दरोडे घालून फंड जमा करीत होते. >चिखलीतही कटकारस्थानऔरंगाबाद चकमकीनंतर तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ झोकून पळून गेलेला मोहम्मद सलिख याचा शोध घेण्यासाठी एटीएस जंगजंग पछाडत होती. दरम्यान, औरंगाबाद चकमक आणि तत्पूर्वी चिखली (जि. बुलडाणा) जवळ त्याने कटकारस्थान केल्याचे तपासात पुढे आले होते. त्यामुळे त्याच्याकडून राज्यातील सिमीच्या नेटवर्कचा धक्कादायक खुलासा होऊ शकतो, अशी खात्री एटीएसला होती. त्याला खंडवा जेल ब्रेक प्रकरणात अटक झाल्याचे माहीत झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद एटीएसने मध्य प्रदेशच्या सुरक्षा यंत्रणांकडे त्याचा ताबा मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, खंडवा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला मध्य प्रदेशातून बाहेर काढण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे त्याचा ताबा स्थानिक एटीएसला मिळू शकला नाही. आज भोपाळच्या जेल ब्रेक आणि एन्काऊंटरमध्ये खालिद, खिलजीसोबत सलिखचेही नाव आल्याने तपास यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.