शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

अतिरेकी मुंबईत करणार होते ‘गॅस अटॅक’? जोगेश्वरीतून संशयित दहशतवाद्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 6:51 AM

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित झाकीर हुसेन शेख या तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

मुंबई: दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या संशयित अतिरेक्यांचा मुंबईत गर्दीच्या ठिकाणी विषारी वायूद्वारे (गॅस अटॅक) घातपात करण्याचा कट होता. त्यासाठी महत्त्वाची रेल्वे स्टेशन तसेच गजबजलेल्या ठिकाणांची रेकी करण्यात येणार होती, असे सांगण्यात आले. (Terrorists were going to carry out 'gas attack' in Mumbai? Suspected terrorist arrested from Jogeshwari)

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी संबंधित झाकीर हुसेन शेख या तरुणाला मुंबई एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने जोगेश्वरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. झाकीर हा धारावीतील जान मोहम्मदचा साथीदार असून तो घातपात घडविण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविणार होता, असे सांगण्यात येते.

जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तो पसार होण्याच्या प्रयत्नात त्याने पत्नीला वांद्रे येथील नातेवाइकाकडे पाठविले होते. त्याची माहिती मिळताच एटीएसने क्राइम ब्रँचच्या मदतीने सापळा रचला. त्याच्या पत्नीच्या मदतीने  झाकिरला फोन करून जोगेश्वरी परिसरात बोलावून अटक केली. 

त्यानंतर नागपाडा एटीएस कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्याला अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याचे समजते. जान मोहम्मद आणि त्याच्या संबंधाबाबत माहिती घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याने काही दिवस तो मुंबई एटीएसच्या ताब्यात राहील. या कारवाईमुळे दिल्ली पोलीसबरोबर त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. वास्तविक हा कट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला होता, तसेच झाकीरला पकडण्यासाठी मंगळवारी त्यांचे पथक मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या तो हाती लागला नाही. एटीएसची कोठडी संपल्यानंतर त्यांना झाकीरचा ताबा मिळू शकतो. तोपर्यंत एटीएसच्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कारवाई-  चार दिवसांपूर्वी जान मोहम्मद शेखसह इतर पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एकाच वेळेस महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यात आली होती. जान मोहम्मद हा गेल्या २० वर्षांपासून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित होता. सध्या तो अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. -  मुंबईसह उत्तर प्रदेश व दिल्लीत हल्ला करण्यासाठी त्यांना अहमदकडून शस्त्रास्त्रे पुरविली जाणार होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. -  दिल्ली पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आल्याने त्याची महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेत त्याचा स्वतंत्र तपास सुरू केला होता. त्यामध्येच आता आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीMumbaiमुंबईPoliceपोलिसMumbai policeमुंबई पोलीस