शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
7
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
8
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
9
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
10
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
11
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
12
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
13
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
14
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
15
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
16
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
17
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
18
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
19
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
20
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 2:09 PM

Lok Sabha Election 2024 : हातकणंगले जागेवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र या मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमदेवार यादी जाहीर झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कल्याण, पालघर, हातकणंगले आणि जळगाव या चार जागांसाठी ही उमेदवारांची यादी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. याठिकाणी सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले आहे. 

हातकणंगले जागेवर स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, ठाकरे गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. याला राजू शेट्टी यांनी नकार दिला होता. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. तर वंचितकडून डी. सी. पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. आता पुन्हा धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दरम्यान, ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीत कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पालघरमधून भारती कामडी आणि जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडेच राजकीय गणित पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी विनंती केली की, आमचा उमेदवार त्याठिकाणी द्यावा. राजू शेट्टी यांना आम्ही सांगितलं की, पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी  बुलढाणा - नरेंद्र खेडेकरयवतमाळ-वाशिम - संजय देशमुखमावळ - संजोग वाघेरे-पाटीलसांगली -चंद्रहार पाटीलहिंगोली - नागेश पाटील आष्टीकरछत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरेधाराशिव - ओमराजे निंबाळकरशिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरेनाशिक - राजाभाई वाजेरायगड - अनंत गीतेसिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊतठाणे - राजन विचारेमुंबई-ईशान्य - संजय दिना पाटीलमुंबई-दक्षिण - अरविंद सावंतमुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकरपरभणी - संजय जाधवमुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई 

टॅग्स :hatkanangle-pcहातकणंगलेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raju Shettyराजू शेट्टी