Vinayak Raut News: राज ठाकरेंनी नेहमी सारखी उद्धव ठाकरेंचा द्वेष करण्यासाठी सभा घेतली. राज ठाकरेंनी जी टीका केली त्यांनी रिफायनरी संदर्भात जर थोडी माहीती घेतली असती तर ती टीका केली नसती. रिफायनरी होणार त्या परिसरात १४ हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्प आहेत, ती राज ठाकरेंनी येऊन पाहावी, असे सांगत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी टीका केली.
राज ठाकरे ज्यांच्या बुडता जहाजाला पाठिंबा द्यायला आलात ते राणे रिफायनरीला समर्थन देणारे राणे खरे की विरोध करणारे खरे. विनायक राऊत यांचे आव्हान आहे आम्ही जर रीफायनरीच्या बाजूची एक इंच जरी जागा घेतली असेल तर ते राज ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर त्या गावात येऊन लोकांची माफी मागावी. कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीला समर्थन करणारे राज ठाकरे खरे, अशी विचारणा विनायक राऊतांनी केली.
राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली
राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली. मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले ते देवेंद्र फडणवीस व शिंदेच्या कारकिर्दीत गेले. आम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत एक निष्ठावंत राहिलो आहोत, त्यामुळे कोकणची जनता आमच्यासोबत राहील. कुडाळ एमआयडीसीतील भूखंड नारायण राणे पुरस्कृत भूमाफीयांनी अडवून ठेवले आहेत, असा आरोप विनायक राऊतांनी केला.
दरम्यान, शिवसेनेत नारायण राणे होते तेव्हा ते विकास काम करत होते मात्र आता ते काय दिवे लावतायत? एमएसएमई खात्याचे खरे लाभार्थी नारायण राणे आहेत. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची लूट होते आहे. सात तारीखला दुपारी अपप्रवृत्ती गाडली जाईल, असा हल्लाबोल विनायक राऊतांनी केला.