शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
4
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
5
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
7
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
8
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
9
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
10
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
11
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
12
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
13
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
14
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
15
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
16
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
17
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
18
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
19
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
20
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

'तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड...'; एकनाथ शिंदेंच्या टीकेला अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 9:47 AM

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले हेच पंतप्रधान मोदींचे यश आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचे काम केले. देशात २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढले तर ८० टक्के लोकांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोदींना पर्याय नाही. त्यामुळे यावेळी अब की बार ४५ पारचा नारा यशस्वी करून दाखवावा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोडून बोला मुख्यमंत्री महोदय...माझ्यासाहित तुम्हाला देखील पोलिओ डोस काँग्रेस सरकारच्या कालखंडात दिले गेले. मग तो डोस काँग्रेसने किंवा तेव्हाच्या पंतप्रधानांनी दिलेला होता का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तसेच वंदे भारत, राम मंदिर या दोन गोष्टी देशातील जनतेच्या घामा कष्टाच्या पै-पै जमवून झालेल्या आहेत. महाशक्तीच्या खिशातील पैशाने नाही, हे लक्षात ठेवा, असं अंबादान दानवे म्हणाले. तुम्ही फक्त गुंड आवरा गुंड, सध्या एवढे केले तरी खूप आहे महाराष्ट्रासाठी. राहता राहिला प्रश्न फुकट धान्याचा.. या देशातील लोक फुकट धान्य मागत नाही येत. त्यांच्या पिकाला वाजवी दाम मागतात ते! ते तुमच्या सरकारकडून होणे नाही, असा निशाणा अंबादास दानवे यांनी साधला.

रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली-

रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपाच्या बापाची नाही. रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली. दोन-चार नवीन ट्रेन तुम्ही सुरू केल्या, त्या मालकीच्या आहेत का, देश तुमच्या मालकीचा आहे का, या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची नाही. भाजपावाले मुर्ख आहेत. त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून हल्लाबोल केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmbadas Danweyअंबादास दानवे