मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्या परिषदेत NCP नेते जितेंद्र आव्हाडांनीछत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अशाप्रकारे आव्हाडांनी विधान केले. त्यावरून शिवसेना ठाकरे गटानेही आव्हाडांना फटकारलं आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केले त्यावर बिल्कुल सहमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे स्थान, वेगळे महत्त्व आहे. अफझलखान होते, शाहिस्तेखान होते म्हणून शिवाजी महाराज होते असं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून त्यांचे नाव उरले अन्यथा कुठेही नाव उरले नसते असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला. त्याचसोबत सहकारी पक्ष असला म्हणून काय झाले. ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात. शिवसेनेचा स्वतंत्र विचार आहे असं सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.
विधान मागे घेणार नाही - आव्हाड माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. मी जे बोललो त्याचे संदर्भासहित हे स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले. तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची, आम्ही देऊ उत्तर. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो..करारा जवाब मिलेगा असे म्हणत आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत मी माझ्या विधानावर ठाम आहे असल्याचं स्पष्ट केले आहे.
रावण काढून श्रीराम समजावून सांगाजितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.