शहरं
Join us  
Trending Stories
1
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’
2
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
3
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
4
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
5
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
6
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
7
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
8
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
9
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
10
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
11
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
12
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
13
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
14
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
15
जमिनीवर भिंतीवर आपटले, मन भरलं नाही म्हणून दगडाने ठेचले; श्वान प्रेमीने केली पाच पिल्लांची हत्या
16
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
17
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
18
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
19
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
20
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 

“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:41 IST

Thackeray Group Sanjay Raut News: राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Thackeray Group Sanjay Raut News: गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तर, हे भाजपचे षड्‍यंत्र  असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावरून मनसे आक्रमक झाली असून, राजकीय वर्तुळातील काही पक्षांकडून मनसेवर टीका केली जात आहे. 

उत्तर भारतीयांविरोधातील हिंसेला राज ठाकरे पाठिंबा देत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरील कारवाईसंदर्भात निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. तर, मनसेची मान्यता रद्द करावी, यासाठी कुणीतरी उत्तर भारतीय म्हणे न्यायालयात गेला आहे. मराठी प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या षड्‍यंत्रामागे भाजप आहे, असे मनसे संदीप देशपांडे म्हणाले. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार यांनी भाजपावर टीका केली आहे.

...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर

धार्मिक द्वेष हा विषय असेल तर सर्वांत आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी. धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचे काम या देशात कोणी करत असेल तर ते काम भाजपा करत आहे. भाजपाचे प्रचारक, कोणीतरी धीरेंद्र शास्त्री असे म्हणतात की, कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा नये. गावांमध्ये केवळ हिंदूंनी राहावे. अशा प्रकारची भाषा करणारे लोकही या देशात आहेत. ते बुवा देखील असेच म्हणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या बुवाच्या दर्शनाला जातात. मोदी त्या बुवाचे दर्शन घेतात, त्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात याचाच अर्थ मोदींची त्या शास्त्रीबुवांच्या म्हणण्याला मान्यता आहे. त्यामुळे हा धार्मिक द्वेषाचा मुद्दा असेल तर धार्मिक द्वेष पसरवला म्हणून सर्वांत आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी. पक्षाची मान्यता रद्द करण्यास भाजपापासूनच सुरुवात करायला हवी. मनसे वगैरे नंतरचे पक्ष आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

दरम्यान, नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात उठले आहे आणि केवळ एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत ना, मग या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे. काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे आणि रत्नागिरीचे उदय सामंत. सत्तेवर बसले आहेत. भोंगे सुटले आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे