शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

भाजपाचे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? संजय राऊतांची संतापले; म्हणाले, “होऊच शकते कारण...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:33 IST

Thackeray Group MP Sanjay Raut News: भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Thackeray Group MP Sanjay Raut News:  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे अजूनही गृहखात्यावरील दावा सोडलेला नसल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजपा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना भाजपावर निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागा मिळवून बहुमतासह राज्यात सरकार बनवले. त्यातच मविआचे अनेक खासदार भाजपाच्या संपर्कात आले आहेत. विशेषत: शरद पवार गटाचे खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने भाजपा पवारांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहे. याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दावा केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते 

भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते. कारण त्यांच्याकडे पैसा आणि यंत्रणा आहे. याआधीही अशा प्रकारे माणसे फोडलेले आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेले? भीती पोटीच गेले ना? ते पण ऑपरेशन लोटस नव्हते तर ऑपरेशन डर होते. त्यामुळे ते घाबरून तिकडे गेले. भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे असे सुरु आहे. भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही. आता २० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल. गृहखाते कोणाकडे द्यायचे हे ठरत नसेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, निश्चितपणे मविआचे खासदार-आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. मविआचे खासदार विशेषत: शरद पवारांचे खासदार आहेत तिथे महायुतीचे आमदार निवडून आले. विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत ते हालचाली करत आहेत. केंद्रात भाजपा युतीचे आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी आपण निवडणूक लढवतोय तो विकास त्यातून शरद पवारांच्या पक्षातील खासदार भाजपासोबत येण्याचा विचार करू शकतात, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा