शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

क्रीडा भवनच्या जागेवर ठाकरेंचे स्मारक?

By admin | Published: January 05, 2015 7:28 AM

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे उभारायचे स्मारक सध्या वीर सावरकर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनच्या जागेवर करण्याच्या हालचाली सुरू आहेत

संदीप प्रधान, मुंबईदिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे उभारायचे स्मारक सध्या वीर सावरकर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनच्या जागेवर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे हे क्रीडा भवन नादुरुस्त असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी ते बंद करण्यात आले आहे.महापालिकेच्या क्रीडा भवनचा हा भूखंड ३१०८ चौ.मी. क्षेत्रफळाचा असून, प्रत्यक्ष वापराकरिता २७७९.८५ चौ.मी. भूखंड उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी ६१० चौ.मी. क्षेत्रावर टेनिस कोर्ट होते. याखेरीज बॅडमिंटन, कॅरम, पत्ते खेळण्याची सोय होती. शिवाजी पार्क परिसरातील काही मंडळी व विशेषकरून मध्यमवर्गीय कुटुंबातील क्रीडापटू या क्रीडा भवनचा वापर करीत होते. दोन दिवसांपूर्वी दुरुस्तीकरिता ही वास्तू अचानक बंद केली. प्रत्यक्षात या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा सुरू आहे. २३ जानेवारीस बाळासाहेबांची जयंती असून, त्यावेळी याबाबतची घोषणा अपेक्षित आहे. शिवसेनाप्रमुखांवर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे तेथे शिवसैनिकांना माथा टेकून दर्शन घेण्याकरिता चौथरा उभा केला आहे. मात्र शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, वापरातील वस्तू, त्यांची गाजलेली भाषणे वगैरेचे प्रदर्शन उभारण्याकरिता स्मारकापासून हाकेच्या अंतरावर क्रीडा भवनचीच जागा सोयीची आहे. याच रस्त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर व संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांची महती सांगणाऱ्या वास्तू आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना विचारले असता ते म्हणाले, की क्रीडा भवनच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता ३ ते ४ जागांचा विचार सुरू आहे. त्यामध्ये या जागेचा समावेश निश्चित आहे. शिवाजी पार्क परिसरात क्रीडा भवनच्या जागेखेरीज दुसरी जागा उपलब्ध आहे का, असे विचारले असता या परिसरात दुसरी जागा नाही, असे शेवाळे यांनी स्पष्ट केले.