शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

ठाकरेंनी म्हणावे, ‘रात गई बात गई’! त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 10:12 AM

"पवार ठाकरेंची माती करतील"

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘उद्धव ठाकरेंनी म्हणावे रात गई बात गई, आम्ही त्यांना बरोबर घेऊ. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहे ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणारे नाहीत,’ असे सूचित करत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ठाकरे यांनी विचार करावा, शरद पवार त्यांच्या पक्षाची माती करतील असे सांगितले.

ठाकरे यांनी पुन्हा भाजपबरोबर येण्याचे काही संकेत दिले आहेत का, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणाऱ्यातले नाहीत. 

मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रात गई बात गई असे म्हणायला हवे. त्यांनी ३३ महिने त्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. एकदाही त्यांनी घरी या, एकत्र बसू असे म्हटलेले नाही.”  शरद पवार यांच्या मागे गेल्याने अनेक नेत्यांची माती झाली. तसेच ते पक्ष म्हणून ठाकरेंचीही माती करतील असे म्हणत पाटील यांनी पवार यांनाही लक्ष्य केले.

उद्धव यांनीच मोदींशी जुळवून घ्यावे : केसरकर

कोल्हापूर : ‘उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले व त्यांना दिलेले वचनही ठाकरे यांनी मोडल्याने पंतप्रधानांचा अपमान झाला. त्यामुळे लहान भाऊ म्हणून ठाकरे यांनीच मोदी यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. आम्ही त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न केले, परंतु ते घडले नाही,’ असे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर