शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

थायलंडची चिंच खामगावच्या बाजारात

By admin | Published: August 22, 2016 10:45 PM

जेथे पिकते तेथे विकत नसते याप्रमाणे तसेच गुणवत्तेसोबतच आकर्षक पॅकिंजच्या जोरावर थायलंडमधील चिंच भारतवासीयांची पसंती ठरत असून चक्क ३२० रुपये किलोप्रमाणे खामगाव

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. २२ : जेथे पिकते तेथे विकत नसते याप्रमाणे तसेच गुणवत्तेसोबतच आकर्षक पॅकिंजच्या जोरावर थायलंडमधील चिंच भारतवासीयांची पसंती ठरत असून चक्क ३२० रुपये किलोप्रमाणे खामगाव तालुक्याठिकाणी सुध्दा या चिंचेची विक्री वाढली आहे. चिंच ही तोंडाला चव आणणारी तसेच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे विविध आजारामध्ये गुणकारी औषध आहे. तर अक्षय्यतृतीयेला प्रत्येक घरी चिंचवण्यासाठी चिंचेचा वापर होतो. मात्र चिंचेची मागणी असताना सुध्दा चिंचेचे झाड लावण्याकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. पक्ष्यांमार्फत वा चिंच खाल्यानंतर बी पडल्याने झाड उगवले अशीच चिंचेची झाडे परिसरात आढळून येतात.

चिंच हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक असल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. तर कृषी विभागाकडूनही चिंचेच्या सुधारित जाती निर्माण करण्याबाबत उदासिनता दिसून येते. परिणामी आज बाजारात थायलंड येथील चिंचेची विक्री वाढली आहे. या चिंचेचे भाव तब्बल ३२० रुपये किलो असे आहेत. मात्र आकर्षक पँकिंग, न्युट्रिशियन चार्ट असल्याने ही चिंच ग्राहकांच्या पसंतीस उतरते. परिणामी आज या विदेशी चिंचेने भारतीय बाजारपेठेत आपली जागा निर्माण केली आहे. खामगाव सारख्या तालुक्याचे ठिकाणी या चिंचेची दररोज किमान १० किलो विक्री होते. एकूणच भारतातही गोड चिंचेचे झाड विकसित केल्यास शेतकऱ्यांना शेतीसोबतच उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होवू शकेल.औषधी गुणधर्मामुळे चिंचेला वाढती मागणीपिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं. त्यामुळे अनेकांच्या स्वयंपाकघरात नित्य वापरण्यासाठी हमखास चिंच असते. यामुळे चिंचेची मागणी मोठ्या प्रमाणात असते.शेतकऱ्यांना होवू शकते उत्पन्नाचे साधनचिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनविला जातो. वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध म्हणून वापरात येते. अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधमार्मुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे. त्यामुळे भारतात चिंचेला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर चिंचेचे झाड लावल्यास पर्यावरण रक्षणासोबतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादनाचे साधन होवू शकते.