पंकज रोडेकर / ठाणेदक्षिणेत बाहुबली या बहुचर्चित चित्रपटातील ‘कटाप्पा’ हा सोशल मीडियाच्या चर्चेचा विषय असताना अशाच एका कटाप्पाच्या मागावर ठाणे शहर पोलिसांची क्राइम बँच लागली आहे. परंतु, हा कटाप्पा बाहुबलीतील नसून तो मीरा रोड येथील रहिवासी आहे. बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणारा राहुल ऊर्फ कटाप्पा हा ठग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याचदरम्यान, फरार शागी ऊर्फ सागर आणि रीमा ठक्कर या बहीणभावांसह १६ फरारीआरोपींप्रमाणे तोही एक असल्याने आता राहुल ऊर्फ कटाप्पा हा पोलिसांच्या रडारवर आहे. कॉल सेंटरप्रकरणी फसवणूक करून धमकावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.ठाणे गुन्हे शाखेने मंगळवारी ४ आणि ८ आॅक्टोबरदरम्यान मीरा रोड परिसरात एकूण वेगवेगळ्या ११ कॉल सेंटरवर धाड टाकून जवळपास ७०१ जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी ४६ जणांना अटक झाली. त्यातील ६३० जणांना नोटिसा बजावल्या. अटकेतील १६ जणांना पोलीस तर उर्वरित ४० जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याचदरम्यान, सात जणांच्या चौकशीत व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतक्या रकमेचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.दोघे बालकामगार-अटक केलेल्या ४६ जणांपैकी हमजा आणि अझर हे दोघे १६ आणि १७ वर्षीय आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. त्यांनी कॉल सेंटरमध्ये मुलाखत देताना, एक वर्ष वाढून सांगितले होते. तरीसुद्धा हमजा याला येथे कामावर ठेवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी पकडल्यावर वय लपवल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
‘कटाप्पा’च्या शोधात ठाणे क्राइम ब्रँच
By admin | Published: October 13, 2016 5:40 AM