शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 1:31 PM

Maharashtra Lok sabha Election 2024: महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे.

मुंबई - महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार गटाने आधीच नक्की केली आहे. भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भाजपचे उमेदवार आहेत. बाकीच्या ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा गृहजिल्हा. त्यामुळेच ठाणे आणि लागून असलेली कल्याणची जागा त्यांना हवी आहे. कल्याणमधून त्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे हे उमेदवार असतील. मात्र, ठाण्याची जागा आपल्याकडे घ्या, असा दबाव भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आणला आहे. आणखी एक नवा द्विस्ट आला आहे. ठाण्यासाठी शिंदे फारच आग्रही राहिले, तर तिथे श्रीकांत शिंदेंना लढवायला सांगा आणि कल्याणची जागा आपल्याकडे घ्या, असेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाले तर कल्याणमधून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे उमेदवार असतील.

पालघरच्या जागेचा पेच वेगळ्या कारणाने सुटत नाही. ही जागा भाजपने मागितली ॐ आहे. तिथले खासदार राजेंद्र गावित, हे शिदेसेनेत आहेत. गावित यांना भाजपमध्ये आणून लढवावे, असा एक प्रस्ताव भाजपकडून देण्यात आल्याचे समजते.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विषय अधिकच ताणला गेला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिथे शिदेसेनेकडून लढायचे आहे; पण भाजपने कुठल्याही परिस्थितीत ही जागा आम्हाला द्या, असा आग्रह धरला असल्याची माहिती आहे. तेथे भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची चर्चा असली तरी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना लढण्याचा पक्षादेश आला, तर त्यांचा नाइलाज असेल. स्वतः चव्हाण तेथून लढण्यास इच्छुक नाहीत.

 महाजन, शेलार की साटम?उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवार भाजपला अद्याप ठरवता आलेला नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीबाबतची अनिश्चितता कायम आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार उत्सुक नसल्याने आता आ. अमित साटम यांचे नाव पुढे आले आहे. दक्षिण मुंबईतील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारही सुरू केला होता: पण उमेदवारी जाहीर न झाल्याने तेही थंडावले आहेत. तेथे मनसेला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. उत्तर-पश्चिम मुंबईची जागा भाजपकडे, की शिंदे गटाकडे, हे ठरलेले नाही.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahayutiमहायुतीkalyan-pcकल्याणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस