शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ठाणे पालिका आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 3:43 AM

महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला.

ठाणे : महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला. महापौरांना विश्वासात न घेता विषयपत्रिका सभागृहासमोर आणलीच कशी, असा प्रश्न करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनाला अचडणीत आणले. सचिवांनी चूक मान्य केल्यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राइकने उत्तर देऊन पटलावरील इतिवृत्त वगळता सर्वच विषय मागे घेत नगरसेवकांची कोंडी केली. महासभा सुरू होताच सचिवांनी विषयपत्रिका वाचताच शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे यांनी हरकत घेत महापौरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केला. तर, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी महापौरांनी सचिव विभागाला जे पत्र दिले आहे, त्याचे वाचन सभागृहात करावे, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधकांनी साथ दिली. सचिवांनी हे पत्र वाचण्यास टाळाटाळ केली. मग आयुक्त सभागृहात येताच त्यांनी पत्र वाचण्यास सांगितले. त्यात काही विषय चर्चा न करताच पटलावर आणण्यास महापौरांनी हरकत घेतली होती. ही बाब चुकीची असून ते विषय प्रशासनाने मागे घ्यावेत, अशीही मागणीही महापौरांनी केली होती. याच मुद्यावरून पुन्हा सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनावर तोंडसुख घत महापौरांना विश्वासात घेऊनच विषयपत्रिका आणण्यावर भर दिला. सचिवांकडून ही चूक तीन वेळा झाल्याचा आरोप विलास सामंत यांनी केला. सचिवांकडून खुलासा मागितला. त्यावर सचिव मनीष जोशी यांनी महापौरांनीच १८ तारखेला महासभा घ्यावी, असा निर्णय घेतल्याचे सांगून त्याची विषय पत्रिका ९ तारखेला प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. काही विषय उशिराने आल्याने त्याची माहिती महापौरांना देणे आवश्यक असतांनाही केवळ कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन ही विषय पत्रिका प्रसिद्ध केल्याचे सांगत चूक झाल्याचे कबूल केले. सचिवांच्या खुलाशानंतर महासभा सुरळीत सुरु होईल, अशी शक्यता असतांनाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही प्रशासनाची चूक मान्य करत केली. यापुढे एखाद्या विषयाचा गोषवारा उपलब्ध झाला नाही तर तो विषय पटलावर घेतला जाणार नाही असे सांगून अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करू असे जाहीर करत सर्व विषय माघे घेतल्याचे जाहीर केल्याने महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले. आयुक्तांच्या सर्जिकल स्ट्राईकने सर्वच नगरसेवक हादरले. पण याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले. तुम्ही या मानपमानाच्या नाट्यात पडला नसतात तर नगरसेवकांच्या प्रभागातील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले असते, असा टोला काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांनीही महासभा घेण्याची मागणी केली. परंतु, आयुक्त आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे ही महासभा पुन्हा होणार असे महापौर सांगत असले, तरी थेट पुढील महिन्यात महासभा होईल, असे आयुक्तांनी सांगितल्याने सर्वपक्षीय सदस्य हबकले. त्या सभेत विषय मंजूर झाल्यावर लगेचच आचारसंहिता लागली, तर कामे होणार कधी असा प्रश्न त्यांना पडला. (प्रतिनिधी)>प्रशासनाची मनमानी; महापौरांचा आरोपसदस्यांचे विषय मार्गी लागावे हीच माझी नेहमी इच्छा होती. परंतु,अनेक वेळा सदस्यांचे विषय मागे ठेवून प्रशासन स्वत:चे विषय पटलावर आणत होते असा गौप्यस्फोट महापौर संजय मोरे यांनी सभागृहासमोर केला. रस्त्यांच्या विषयातही प्रशासनाकडून आडकाठी घातली गेली होती. वारंवार असे प्रकार घडत असल्याने ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून मी हा पत्रव्यवहार केला होता. परंतु, त्याचा कुठेही गवगवा केला नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी नगरसेवकांचा सभात्यागमहापौरांना डावलून प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून प्रशासनाला कामे करायची नसल्याचे सांगत शिवसेनेचे नगरसेवक काशीराम राऊत यांनी सभागृहात विषय पत्रिका उधळून प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला. प्रशासनाकडून अशा प्रकारे नगरसेवकांची पिळवणूक सुरु असून, नगरसेवकांची कामे होऊ नयेत हीच त्यांची इच्छा असल्याचे मत व्यक्त करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनीही सभात्याग केला.