मुंबई : पुण्यात सर्वाधिक १०,५०२ शाळाबाह्य मुले आहेत. त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागतो. ठाण्यात ६,४८३ शाळाबाह्य मुले आहेत. तर ६,२७९ मुलांसह मुंबई तिसºया स्थानी असल्याची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आली आहे.शालेय शिक्षण विभागाने मागील ३ वर्षांपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केलेले नाही. मात्र समर्थन या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते रूपेश किर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीअंतर्गत प्राथमिक परिषदेने जिल्ह्यांकडील उपलब्ध आकडेवारी दिली. त्यानुसार राज्यातील सर्वाधिक १०,५०२ एवढी शाळाबाह्य मुले पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर ६,४८३ मुलांसह ठाण्याचा क्रमांक लागतो, तर ६,२७९ इतक्या शाळाबाह्य मुलांसह मुंबई तिसºया क्रमांकावर आहे. राज्यात एकूण ६८,२२३ शाळाबाह्य मुले आहेत.शाळाबाह्य सर्वेक्षणासाठी नेमलेली यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत नाही, हे सरकारचे अपयश असल्याची टीका शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. मागील तीन वर्षांपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात न आल्याने हा आकडा फसवा असून यापेक्षा अधिक शाळाबाह्य मुले असू शकतात, असा शिक्षणतज्ज्ञांचा अंदाज आहे.>राज्यात ६८,२२३ मुलेराज्यात २०१७-१८ मध्ये एकूण ६८,२२३ शाळाबाह्य मुले आहेत. २०१६-१७ मध्ये ही संख्या १,०८,४२७ इतकी होती. सर्वात कमी म्हणजे १६९ एवढी शाळाबाह्य मुले लातूरमध्ये आहेत. त्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचा क्रमांक लागतो. तेथे त्यांची संख्या अनुक्रमे २३३ व २४५ इतकी आहे.जिल्ह्याचे नाव शाळाबाह्य मुलांची संख्या२०१६-१७ २०१७-१८पुणे १०,०६९ १०,५०२मुंबई १३,१२३ ६,२७९मुंबई उपनगर १,९३१ १,७८४ठाणे ९,०६५ ६,४८३नाशिक ५,६२४ ३,४२६नांदेड ४,४२६ २,८११
शाळाबाह्य मुलांमध्ये ठाणे दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:06 AM