ठाणे : स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्यासाठी ठाणे महापालिकेने नवी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून नेबरहुड ब्युटिफिकेशन या संकल्पनेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी महापौर संजय मोरे यांच्या दालनात झाली. येत्या काही दिवसांत त्याची माहिती नगरसेवकांना देण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.या वेळी २०१२ मध्ये झालेल्या नेबरहुड ब्युटिफिकेशन या प्रस्तावावर चर्चा झाली. आता त्यात ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करून घेण्याचा विचार आहे. त्यानुसार विविध उपक्रम, स्पर्धा राबवल्या जाऊन त्याचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. यात झोपडपट्टी भागालाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ठाणेकर एकत्र येणार?
By admin | Published: July 08, 2015 1:59 AM