शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठाणेकरांचे शानदार विजेतेपद

By admin | Published: October 18, 2016 4:14 AM

मुंबई उपनगरचे तगडे आव्हान परतावून ४४व्या ज्यूनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद पटकावले.

मुंबई : अलाहिदा डावापर्यंत रंगलेल्या अत्यंत थरारक सामन्यात अवघा एक गुण आणि १० सेकंदांनी बाजी मारत गतविजेत्या ठाण्याने बलाढ्य मुंबई उपनगरचे तगडे आव्हान परतावून ४४व्या ज्यूनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी मुलींच्या गटात पुणेकरांनी संभाव्य विजेत्या ठाणेकरांना धक्का देत बाजी मारली.महाराष्ट्र खो - खो संघटना व अहमदनगर जिल्हा खो - खो संघटना यांच्या मान्यतेने शेवगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील कुमार गटाचा अंतिम सामना चांगलाच चुरशीचा रंगला. निर्धारीत वेळेत ठाणे व मुंबई उपनगरने दोन्ही डावांत ५-५, ५-५ अशी बरोबरी साधल्याने सामना अलाहिदा डावात खेळविण्याचा निर्णय झाला. यावेळी मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना ठाणेकरांनी अवघ्या एका गुणाने ६-५ अशी निर्णायक बाजी मारुन मुंबई उपनगरला धक्का दिला. जीतेश म्हसकर, आकाश तोरणे यांनी अष्टपैलू खेळ करताना ठाण्याचे जेतेपद साकरले. तर मुंबई उपनगरकडून आशिष बने, निहार दुबळे आणि ओमकार सोनावणे यांचा कडवा प्रतिकार अपयशी ठरला.दुसरीकडे, मुलींच्या गटात पुणेकरांनी चमकदार खेळ करताना बलाढ्य ठाण्याचे तगडे आव्हान ४-४, ५-४ असा एका गुणाने आणि १ मिनिट राखून परतावले. मध्यंतराला दोन्ही संघांनी बरोबरी साधल्यानंतर पुणेकरांनी आक्रमक खेळ करताना एका गुणाची कमाई करुन विजेतेपदावर नाव कोरले. श्रेया आडकरच्या अष्टपैलू खेळासह सपना जाधव, प्रणाली बेनके आणि कोमल दारवटकर यांचे दमदार संरक्षण पुण्याच्या विजेतेपदामध्ये निर्णायक ठरले. तर, ठाण्याकडून रेश्मा राठोड, रुपाली बडे, गुलाब म्हसकर आणि तेजश्री कोंढाळकर यांची झुंज अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)>वैयक्तिक विजेते :सर्वोत्कृष्ट संरक्षक :कुमार : आकाश तोरणे (ठाणे)मुली : रेश्मा राठोड (ठाणे)सर्वोत्कृष्ट आक्रमक :कुमार : शुभम उत्तेकर (ठाणे)मुली : श्रेया आडकर (पुणे)सर्वोत्कृष्ट अष्टपैलू :कुमार : निहार दुबळे (मुंबई उपनगर)मुली : कोमल दारवटकर (पुणे)