शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ठाण्याचे ‘डराव डराव’ सर्वोत्कृष्ट!

By admin | Published: January 01, 2016 2:21 AM

ज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या १३ व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव...डराव’ या नाटकाला प्रथम पारितोषिक

ठाणे : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या १३ व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव...डराव’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यभरात पाच विभागांत घेतलेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या नाटकांची स्पर्धा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात २८ ते ३० डिसेंबरदरम्यान झाली. यात सादर झालेल्या १३ नाटकांतून ठाण्याच्या ‘डराव डराव’ने बाजी मारली आहे. दुसरा क्रमांक मुंबईतील महाराष्ट्र सेवा संघाच्या ‘तुफानातील मोती’ने तर तृतीय क्रमांक सांगलीच्या सस्नेह कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या ‘एका झाडाची गोष्ट’ने पटकावला. नाशिकच्या प्रबोधिनी विद्यामंदिरच्या ‘शहाणपण देगा देवा’ या नाटकाला अपंग गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.वैयक्तिक पुरस्कारांमध्ये दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक राजेश राणे (डराव डराव), द्वितीय पारितोषिक वीणा नाटेकर (तुफानातील मोती), तृतीय उदय गोडबोले (एका झाडाची गोष्ट), अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक रमेश वनीस (शहाणपण देगा देवा) यांना जाहीर झाले आहेत. प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक दीपक नांदगावकर (शेवटचे स्पंदन), द्वितीय सतीश साळुंखे (राखेतून उडाला मोर) तर नेपथ्यासाठी प्रथम विजय फडके (एका झाडाची गोष्ट), द्वितीय अर्चना पवार यांना जाहीर झाले आहे.