शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

...म्हणून राहुल गांधी तुमचे आभार! शरद पोंक्षे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 5:45 PM

आपण हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण लवकर पेटतही नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो.

ठळक मुद्देनिगडी प्राधिकरणमध्ये ' सावरकर विचार दर्शन ' या विषयावर आयोजित व्याख्यानस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रीय हिंदुत्वाचा विचार जोपासलादुबळ्या माणसांच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाहीसावरकरांना ब्राह्मण या व्याख्येत अडकवून ठेवले

पिंपरी चिंचवड : सर्व जग मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये विभागले गेले आहे. भारत हाच एकमेव हिंदू राष्ट्र आहे. परंतु, हिंदू राष्ट्र म्हटले की आम्ही धर्मांध ठरतो. धर्म समजून न घेतल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच हिंदू हा पटकन जागा होत नाही. त्यांना जागे करण्यासाठी राहुल गांधी यांच्यासारखी माणसे उपयोगी पडतात. त्यांनी महिना दीड महिने अशी विधाने करत राहावी, असे म्हणत सावकरांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप, सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरणमध्ये ' सावरकर विचार दर्शन ' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निगडी, प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ कार्यालयाच्या मैदानावर आयोजित या व्याख्यानाला सावरकर प्रेमींची तुफान गर्दी झाली होती. 

शरद पोंक्षे म्हणाले. काही मुलं गतिमंद असतात. मला राहुल गांधी यांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांच्यावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना विनंती करतो की, सतत दीड दोन महिन्यांनी त्यांनी असंच विधान करत राहावं. त्याच्यामुळे काय होतं, हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण पेटतही लवकर नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागाच होत नाही. मग अशी माणसं उपयोगी पडतात. ते तिकडं वेड्यासारखा बोलले की सगळ्यांच्या मनातील सावरकर, शिवाजी, राणा प्रताप, टिळक हे जागे होतात. मग आपण धडाधड त्यांच्याबद्दल शोधाशोध करण्यास सुरुवात करतो. काही मिळतंय का.. असं म्हणत व्हॉट्सअपवर फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. त्यात माझीही अनेक भाषणं अनेक ठिकाणी फिरतात. मग माज्यातही सावरकरांबद्दल जागृती होते, ही किती चांगली गोष्ट आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रीय हिंदुत्वाचा विचार जोपासला. त्यांनी देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. सावरकर हे विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून जगलेले आहेत. सावरकर यांनी जात निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या तोडीचे त्यांचे समाजकार्य होते. आंतरजातीय विवाह ही संकल्पना सावकरांनी रूजवली. जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर सावरकर यांनी त्यांना काही सूचनांचे पत्र पाठविले. देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी मजबूत भींत बांधण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले. सावरकरांना ब्राह्मण या व्याख्येत अडकवून ठेवले गेले.

.......................

दुबळ्या माणसांच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाहीसर्व जग मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये विभागले गेले आहे. भारत हाच एकमेव हिंदू राष्ट्र आहे. परंतु, हिंदू राष्ट्र म्हटले की आम्ही धर्मांध ठरतो. धर्म समजून न घेतल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे. ज्या ज्या देशात जे बहुसंख्य राहतात, ते देश त्या धमार्चे असतात. त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. देशातील नागरिकांना अहिंसेचे डोस पाजले गेले. रक्ताच्या थेंबाची किंमत आपणाला कळलीच नाही. अहिंसा परमोधर्म असेल, तर महाभारतात श्रीकृष्णाने अजुर्नाला भगवद्गीता सांगताना अहिंसेच्या मागार्ने जायला हवे होते. परंतु श्रीकृष्णाने धर्माच्या बाजूने राहण्यास सांगितले. दुबळ्या माणसांच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. सशस्त्र माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसते, असे पोंक्षे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRahul Gandhiराहुल गांधीSharad Ponksheशरद पोंक्षे