शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

शुक्र है, हम लौट आए!

By admin | Published: April 03, 2015 2:30 AM

खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली.

मुंबई : ‘खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली. एक वेळ अशी होती की, आता मृत्यू अटळ आहे असे वाटत होते. त्यामुळे बिकट परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी डोंगरदऱ्यांचाही आधार घेण्यात आला, असे जहांगीरकडून सांगण्यात येत होते. जहांगीरप्रमाणेच अन्य भारतीयांचीही अवस्था सारखीच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने येमेनमधील १९0 भारतीयांना मुंबईत आणण्यात आले. पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर आल्यानंतर यातील काही जण इतर राज्यातील असल्याने त्यांची मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था करण्यात आली होती. २२ जानेवारीपासून येमेनमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले असून, त्याने रौद्र रूपच धारण केले आहे. या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले असून, यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. यातीलच १९0 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान एडनमधून निघून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे उतरले. यातील १०० जणांना रेल्वेने इतर राज्यांत पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रत्यक्षात पहाटे विमानतळावर येमेनमधून परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना सीएसटी येथील रेल्वेच्या मुख्यालयात नेण्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद उपस्थित होते. मध्य रेल्वेकडून या परतलेल्या भारतीयांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करतानाच त्यांना रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी उपस्थित येमेनमधून परतलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एडनमध्ये एका सिमेंट कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला असलेले शक्तीदासन हे मूळचे केरळचे. गेल्याच वर्षी तेथे शक्तीदासन कामाला गेले होते. याविषयी शक्तीदासन यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगतानाच कुटुंबीयांचीही चिंता लागून राहिली होती. मात्र सर्व काही संपले आहे, असे वाटत असतानाच भारतात सुखरूप परतल्याने हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्र्रिया शक्तीदासन यांनी दिली. त्या ठिकाणी योवान मंगेश या एका रुग्णालयात लॅब टॅक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तर मृत्यू कधी कवटाळेल अशीच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाल्याचे सांगितले. भारतात आपण परतणार की नाही असे अनेक विचार येत होते. पण यातून सुखरूपपणे सुटका झाली असून, ते दिवस जरी आठवले तरी अंगावर शहारे येत असल्याचे मंगेश याने सांगितले.