शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

"अध्यादेशावेळी मदतीसाठी धन्यवाद, आता जरा दिल्लीत जनजागरण करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 9:07 AM

ओबीसी आरक्षणासाठी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे फडणवीसांना आवाहन

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची मदत केली. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आता ओबीसी प्रश्नावर राज्यात जनजागरण करण्याऐवजी देेवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन जनजागरण करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून देण्याची मागणी करावी. केंद्राकडे असलेला तयार डाटा उपलब्ध झाल्यास समस्या दूर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.  नागपूर दौऱ्यावर असलेले भुजबळ यांनी मंगळवारी ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट देत ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा आणि निदेशक (परिचालन) अशोक जैन यावेळी उपस्थित होते. ओबीसी आरक्षणासोबतच मनपा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.   ओबीसी आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपला ओबीसींची इतकीच चिंता होती, तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे व एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय का केला? अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येताहेत. त्यामुळेच २०२१ च्या जनगणनेचे काम थांबले आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना ओबीसींचा डाटा मिळविण्यासाठी घरोघरी पाठवणे योग्य होणार नाही.  परंतु तेव्हापर्यंत केंद्राकडे उपलब्ध असलेल्या डाटाचा उपयोग करता येऊ शकतो. भाजप नेत्यांनी या दिशेने पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  ‘आयोगाने काम सांगितले तर सरकार पैसे देईल’सर्वोच्च न्यायालयाद्वारे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने गठित केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची दिलेल्या राजीनाम्याबद्दल ते म्हणाले, राजीनामा देणारे लोक फारसे महत्त्वपूर्ण नाहीत. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करीत आयोगाची स्थापना केली. आता आयोगाला ४५० कोटी रुपये दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यात तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले. मोदींची नक्कल करून पुन्हा तुरुंगात जायचे नाही!भुजबळ हे मिमिक्री सुद्धा चांगले करतात. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाची रणनीती काय राहील, याचे उत्तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टाईलमध्ये द्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. यावर भुजबळ केवळ इतकेच म्हणाले की, ‘मोदींची नक्कल करून त्यांना पुन्हा तुरुंगात जायचे नाही’.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhagan Bhujbalछगन भुजबळ