राज्यात अनेकविध घटनांमुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला . यामुळे किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साध तबाप-बेटे तुरुंगात जाणार अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार असं म्हटलं होतं. आता यावरून भाजपच्या मोहित कंबोज यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
"सर्वप्रथम मी हात जोडून संजय राऊत यांचे आभार मानतो. त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्येच राहतील आणि दोघेही दोषी आहेत हे त्यांनी आज दबक्या आवाजात मानलं," असं म्हणत कंबोज यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
काय म्हणाले होते राऊत?संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये बाप-बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार, असं म्हटलं होतं. तसंच आग लगाने वालों का कहाँ खबर रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे, असेही त्यांनी नमूद केलं होतं.