पुणे : पुण्यात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ नाकारल्याचे दृश्य बघायला मिळाले. सत्कार सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर काही काळ प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र त्याचे कारण स्पष्ट झाल्यावर मात्र सर्वांनी फडणवीस यांच्या कृतीची स्तुती केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थेचा प्रथम पदवीदान समारंभ फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा आमदार मिसाळ यांच्या हस्ते सुरु होता. त्यावेळी मिसाळ यांनी पुष्पगुच्छ देण्यासाठी पुढे करताच मुख्यमंत्र्यांनी त्याला प्लास्टिक लावल्याचे लक्षात आणून देत स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यांनी कारण सांगितल्यावर मात्र उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.