शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
2
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
3
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
4
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
5
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
6
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
7
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
8
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
11
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
12
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
13
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
15
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
16
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
17
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
18
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
19
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
20
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

"राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून", नाना पटोलेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 5:37 PM

Nana Patole Criticize BJP: इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजपा सरकार आज वापरत आहे.राहुल गांधी भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली.

मुंबई -  काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून केला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते. 

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मागील ९ वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार फक्त निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्ल्यासारख्या भ्रष्ट लोकांसाठी काम करत आहेत तर राहुल देश वाचविण्यासाठी लढत आहेत. देशातील जनतेचे करोडो रुपये घेऊन हे भ्रष्ट उद्योगपती देशाबाहेर पळाले. या भ्रष्टाचाराविरोधात राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला. अदानी-मोदींच्या संबंधावर लोकसभेत जाब विचारला. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागवी म्हणून विरोधक मागणी करत होते पण राहुल गांधी यांना लोकसभेत बोलूही दिले नाही. 

इंग्रज राजवटीत सरकारविरोधात बोलल्यानंतर कठोर शिक्षा दिली जायची, तीच पद्धत भाजपा सरकार आज वापरत आहे.राहुल गांधींचा चौकशीच्या नावाखाली आधी ईडीच्या कार्यालयात १०-१० तास छळ केला. शेवटी ते भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाहीत हे दिसल्याने त्यांची खासदारकी रद्द केली. याचा आम्ही निषेध करतो, भाजपा सरकार व मोदी सरकारचा धिक्कार करतो आणि आगामी काळात आम्ही भाजपाविरोधात रस्त्यावर उतरून आणखी तीव्र संघर्ष करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा