'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:27 PM2023-08-29T16:27:08+5:302023-08-29T16:27:38+5:30

Nana Patole News: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे.

'The aim is to defeat Modi, 'on allotment of seats in Mavia...', Nana Patole's suggestive statement | 'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

googlenewsNext

मुंबई -  केंद्रातील मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार ३१ ऑगस्ट आणि गुरुवार १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.  त्याचवेळी महाराष्ट्रात महाविकासआघाडीमध्येही जागावाटप कसे होईल, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, या प्रश्नांना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना  पटोले यांनी सूचक विधानातून उत्तर दिलं आहे. 

नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत सांगितले की,  महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव करणे हाच मविआचा उद्देश असून ही आघाडी त्यावर भर देत आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने  राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे.

ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांना सरकारी घरही खाली करावयास भाग पाडले पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी सरकारला राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. मोदी सरकारवरील अविश्वासदर्शक ठरावात भाग घेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तुफान हल्ला केला. मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर तोफ डागली. देशातील हुकुमशाही कारभाराला सडेतोड उत्तर देणाऱ्या राहुल गांधींचा सत्कार १ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

 

Web Title: 'The aim is to defeat Modi, 'on allotment of seats in Mavia...', Nana Patole's suggestive statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.