'देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची', नाना पटोलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 07:27 PM2023-09-05T19:27:36+5:302023-09-05T19:27:54+5:30

Nana Patole's Appeals: मोदी सरकारच्या हुकुमशाहीतून देश व लोकशाही वाचवण्याची लढाई असून ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर आपल्या सर्वांची आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

'The battle to save the country and democracy is not only for Congress but for all of us', appeals Nana Patole | 'देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची', नाना पटोलेंचं आवाहन

'देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची', नाना पटोलेंचं आवाहन

googlenewsNext

मुंबई -  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे. काँग्रसने ६० वर्षात देशभरात विविध संस्थांचे जाळे उभे करुन विकास सगळीकडे पोहचवला आणि मोदी सरकार त्याच संस्था विकून देश चालवत आहेत. मोदी सरकारच्या हुकुमशाहीतून देश व लोकशाही वाचवण्याची लढाई असून ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर आपल्या सर्वांची आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेदरम्यान नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, घर कसे चालवायचे ही चिंता लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरलेले असतानाही मोदी सरकार मात्र पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करत नाही. राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे. शेतीला आठ तासही विज मिळत नाही, या परिस्थितीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे.

जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्हा सेवादलाने आयोजित केलेल्या संस्कृतीक कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर चंद्रपूर सेवादलाचे अध्यक्ष सुर्यकांत खणके यांनी जनसंवाद यात्रेसाठी ध्वज नाना पटोले यांच्याकडे हस्तांतरित केला. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सकाळच्या सत्रात नगर जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला व नंतर उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वडकी, राळेगाव, आर्णी, महागाव येथे जनसंवाद यात्रेत सहभागी होत  जनतेला संबोधित केले.

Web Title: 'The battle to save the country and democracy is not only for Congress but for all of us', appeals Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.