ज्ञानेश्वर भाेंडेपुणे : आपण स्वत:ला पुराेगामी म्हणताे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नाराही देताे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण तीन वर्षांपासून सातत्याने घटत असून, ते ९१९ वरून ९०६ वर आले आहे. आराेग्य विभागाच्या आकडेवारीतून ही बाब उघडकीस आली आहे.
२०१९ पूर्वी समाधानकारकसमाधानाची बाब म्हणजे २०१९ च्या आधी सलग दाेन वर्षे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत हाेते. सन २०१७ ला हे लिंग गुणाेत्तर ९१३ (९ लाख ४४ हजार मुले, ८ लाख ६२ हजार मुली), सन २०१८ मध्ये ९१६ (९ लाख २१ हजार मुले, ८ लाख ४३ हजार मुली) व २०१९ मध्ये ते ९१९ (९ लाख १० हजार मुले, ८ लाख ३६ हजार मुली) असे समाधानकारक नाेंदवले गेले हाेते. कळ्यांना गर्भातच खुडणाऱ्या डाॅ. सुदाम मुंढेच्या बीड जिल्ह्यात हे प्रमाण ८९८ आहे. पुण्यात ते २०१९ ला ९०५, २०२० ला ९२४ तर २०२१ ला ९११ इतके नाेंदवले गेले.
बेकायदेशीरपणे लिंग तपासणीवर कडक कारवाई केली जात आहे. काेरोना प्रादुर्भावाच्या काळातही ‘पीसीपीएनडीटी’ कायदा आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. - डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य